रविवार, ६ मार्च, २०१६

सहजीवन...!

संसाराचे असिधारा व्रत
चरैव इति होता गुरुमंत्र…
जगणे त्यांना कळले हो 
सोबतीचे जे जाणिती तंत्र…!

 

सन्मित्र मिलिंद आणि त्यांच्या संकल्पाचे मूर्त स्वरूप सौ. सुजाता क्षीरसागर या जगावेगळ्या, सर्वस्वी अनुरूप दांपत्यास सहजीवनाच्या आणखी एका वर्षपूर्ती बद्दल सस्नेह… या व्रतस्थ दंपतीने विवाहाचा सुवर्ण आणि अमृतच नव्हे तर हिरक महोत्सवही  साजरा करावा ही मनस्वी सदिच्छा!

३ टिप्पण्या:

  1. धन्यवाद उत्तरार्धात आपल्या सारखे सवंगडी मिळाले व जीवनाचा अर्थ समाजाला

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. प्रशंसेबद्दल धन्यवाद, पण काही प्रश्न… नेहमीप्रमाणे

    १. ही प्रतिक्रिया सुमितची कशी असू शकते…?
    २. उत्तरार्ध नेमका कशाचा… आयुष्याचा की आपल्या परिचयाचा…?
    ३. आम्हांस सवंगडी संबोधणे हे आपल्या मनाचे मोठेपण की पुणेरी शालजोडीतले…?
    ४. आणि शेवटी, जी गोष्ट आम्हालाच शोधूनही अद्याप सापडत नाहीये ती आमच्यामुळे तुम्हाला सापडली… हे कसे?

    उत्तर द्याहटवा