शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

अक्षरयज्ञ...!


ज्ञानपिठातून उमलते
जेथे जनस्थानाची कळी
लोपणे कसे असेल या
अमृतवाणीच्या भाळी…

अभिजात तशी चिरंतनही
कविवर्यांची ही भाषा
दुमदुमून सोडते जणू
सप्तपाताळ दाही दिशा

द.मा. - साधूंचा गौरव येथे
हेलाविते मुजावरांची मुक्ती
दिवसेंदिवस दृढ आणिक
नि:स्सिम आमुची भक्ती…!

'मराठी दिन' साजरा करण्यापेक्षा 'मराठी आयुष्ये' जगू
या कल्पनेने सर्व साहित्यधुरीणांना समर्पित…!

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५

आई पपा...!


तुमच्या सहजीवनातून अनेक लोकांना 
खूप प्रेरणा मिळू शकते हे अगदीच खरं
आता कुणी, कसा, काय बोध घ्यावा हे 
ज्याच्या त्याच्या प्रज्ञेवर सोडलेलच बरं…!

यशस्वी सहजीवनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा अन सुवर्ण महोत्सव साजरा करता यावा ही अपेक्षा…!

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

तूट…!


'नाईट लाइफ' अन 'अधिग्रहण'
'प्रधानसेवका' चा कोटींचा सूट
विकासघोषात घुसमटतो विचार
कशी भरून काढावी विवेकी तूट…!

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

व्हँलेन्टाइन डे...!


'काळ' बदलता 'वेळ' बदलली
कुणी जाइना गुलाबाच्या वाटे
यंदा व्हँलेन्टाइनचा साज नवा
कमळाला घड्याळाचे काटे...!

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

'आप'बीती...!


महायोध्यांची सफाई
नीतिमूल्ये जाता सती
सत्तांध डावपेचांची
चिंतनीय 'आप'बीती…!

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

उदाहरणार्थ...!


खान्देशी सांगवीकरास ज्ञानपीठ वैगरे
सन्मानच म्हणायचा अन उदाहरणार्थ
'जगण्याची समृध्द अडगळ' वंदनीय,
बिढार मार्गस्थ अन कोसला कृतार्थ…! 
    
मराठी साहित्यास एक वेगळे परिमाण देणाऱ्या भालचंद्र नेमाडे सरांस
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सहर्ष अभिनंदन…!