शनिवार, २८ जानेवारी, २०१२

स्पंदने...!


तत्त्वांना मुरड अन

तडजोडींचे आवर्तने

मुखवट्यांची तयारी

कुस्करलेली स्पंदने...!

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

गणतंत्र...!


लोकांचे लोकांनी लोकांसाठी

लोकशाही राज्यातले गणतंत्र

प्रश्नांच्या चितेवर उभी समृद्धी

जगण्याचा सुटलेला ताळतंत्र...!

रविवार, २२ जानेवारी, २०१२

साक्षेपी...!


स्वातंत्र्याचे मूल्य अन

योगदानाची जाणीव

स्वकेंद्री जन-मानसात

साक्षेपी विवेकाची उणीव...!

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

खेळखंडोबा...!


त्यांच्या असण्याची अडचण

अन नसता म्हणे खोळंबा

एका अविचारी नीतीने

सगळाच खेळखंडोबा...!

रविवार, १५ जानेवारी, २०१२

संक्रमण...!


संक्रमण कि आक्रमण

वासनांचे व्यक्तित्वावर

उत्तरायण व्हावे समृद्ध

आदीच्या अस्तित्वावर...!

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

अळणी...!


अळणी जगण्याला

सक्तीची चूल...

ओसंडत्या मनाला

विरक्तीची भूल...!

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

अश्वत्थ...!


अभद्रांची मुक्ती

भद्रांच्या तीतीक्षेत

अश्वत्थ ताटकळलेला

बुद्धाच्या प्रतीक्षेत...!

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

लक्षणे...!


संयमी अन अविचल

लक्षणे निर्मळ नि-रोगी

एका गढूळ तरंगाने

अभोग्याचा क्षणात भोगी...!

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

गाभा...!


ओजस्वी संतृप्त

सूर्याची आभा

रिक्त मनाचा

ओसंडता गाभा...!

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

अलवार...!



भावनांचा हिंदोळा

क्षुब्ध तसा अलवार

अतीव तृप्ती कधी

कधी क्लेश हजार...!

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

वीट...!


किती प्रथा अन किती व्यथा

कोण पाखंडी अन भक्त किती

पांडुरंगाच्या विटेला पडल्या चिरा

माउलीच्या भिंतीला भेगांची क्षिती...!

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

फंदी...!


मन पाखरू पाखरू

भ्रमराहून स्वच्छंदी

इथे तिथे उडे बागडे

जसा बारबंड फंदी...!

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

समझोता...!


ते म्हणाले आम्ही हे करू

हे म्हणाले आम्ही ते करू

सगळे म्हणाले वेगळे करू

तो म्हणाला समझोता करू

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

द्वंद्व...!


अल्लड आतुरतेने

भांबावलेले शहाणपण

अन प्रौढ अलिप्ततेने

सांभाळलेले लहानपण...!

सोमवार, २ जानेवारी, २०१२

बदल...!


संकल्प अन विकल्प

भविष्याचे स्वप्न नवे

बदल खरचं हवा तर

मलाच बदलायला हवे...!

रविवार, १ जानेवारी, २०१२

उन्मेष...!


काही खेद

थोडे हर्ष

नवा उन्मेष

नवे वर्ष...!